ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक असून, मागील 24 तासात अमेरिकेत कोरोनाने 2108 बळी घेतले आहेत. एका दिवसांत दोन हजारांपेक्षा जास्त बळी गेलेला अमेरिका हा पहिलाच देश असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 02 हजार 876 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 18 हजार 747 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील 17 कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जगात महामंदी येणार असल्याचा इशारा जागतिक नाणेनिधीने दिला आहे.
जगभरात 16 लाख 99 हजार 583 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 2 हजार 734 जणांचा मृत्यू झाला आहे.