अध्यक्षपदासाठींच्या निवडणुकीनंतर राजकीय पेचप्रसंगात सापडलेल्या अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजविला आहे. गुरूवारी रूग्णंख्या 1 लाख 57 हजारांनी वाढली. काही प्रांतांमध्ये स्थिती विशेष संकटाची आहे. परिणामीं, तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राजकीय सत्ता हस्तांतरण अद्याप न झाल्याने धोरणात्मक निर्णय घेणे प्रशासनाला कठीण जात आहे, असे तज्ञांचे म्हणणे असून सर्वसामान्य लोकांकडून लॉकडाऊनला विरोध होत असल्याने नवी अडचण निर्माण होत आहे.
आम्ही नैराश्याच्या स्थितीत असून आमच्या अपेक्षा संपू लागल्या आहेत, स्थिती कधी सुधारणार हे सांगू शकत नाही. अशाप्रकारच्या स्थितीला तोंड द्यावे लागेल अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे उद्गार टेनेसीचे डायरेक्टर ऑफ क्रिटिकल केयर डॉक्टर एलिसन जॉन्सन यांनी काढले आहेत. तर इदाहोमध्ये डॉक्टरांनी सर्व रुग्णांना बेड पुरविणे अशक्य झाल्याचे म्हटले आहे.