ऑनलाईन टीम/ तरुण भारत
देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह (Union Minister Amit Shah) यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाचे अनेक मोठे नेते अमित शहा यांचे अभिनंदन करत आहेत. अमित शाह यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe Member of the Lok Sabha) यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. अमोल कोल्हे यांनी “माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुम्ही तुमचे वयाचे शतक पूर्ण करा. ज्याप्रमाणे खाद्यतेलांच्या किमती सतत वाढत आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या कर्तव्याचा आलेखही वाढला पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
