अयोध्या : राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 ऑगस्ट रोजी लखनौ ते अयोध्या हा प्रवास रेल्वेने करणार आहेत. त्याचदिवशी राष्ट्रपती कोविंद अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी ते कानपूर आणि लखनौच्या दौऱयावर असतील. गोरखपूर शहरालाही राष्ट्रपती भेट देणार आहेत. चारबाग स्थानकापासून अयोध्येपर्यंत प्रेसिडेंशियल एक्स्प्रेसद्वारे प्रवास करण्याचा विचार सुरू आहे. या रेल्वेप्रवासावरून राज्य सरकार आणि रेल्वे बोर्डाकडून तयारी सुरू झाली आहे. अयोध्येत राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलच्या स्तराचे गेस्ट हाउस तसेच हॉटेल नसल्यानेच त्यांच्यासाठी लखनौमधून अयोध्येपर्यंत प्रेसिडेन्शियल एक्स्प्रेस चालविण्याची तयारी केली जात आहे. राष्ट्रपती भवनाकडून त्यांच्या दौऱयासंबंधी राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. 26 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती अमौसी विमानतळावर दाखल होतील. सर्वप्रथम ते कानपूर येथे जाणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती लखनौमधून अयोध्येत पोहोचणार आहेत.
Previous Articleआपत्तीनंतर उदंड झाले दौरे
Next Article देशव्यापी एनआरसीचा निर्णय नाही
Related Posts
Add A Comment