प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प भारतीय उच्चशिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने संशोधन विकास व कौशल्य विकासाला बळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनुस्यूत अशा विविध बाबींना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरगामी प्रयत्नांची एक महत्त्वपूर्ण सुरवात म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहायला हवे. पंधरा हजारांहून अधिक शाळांची दर्जात्मक वाढवण्याबरोबरच सुमारे शंभर सैनिकी शाळा सुरू करण्याचा संकल्प आहे. गेल्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षण आयोगाची घोषणा केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक अशा नियामक मंडळाची स्थापना केली जाणार आहे. दर्जा, गुणांकन, नियमन आणि निधीपुरवठा असे हे मंडळ कार्य करणार आहे. परदेशी शिक्षण संस्थांच्या सहकार्यातून दुहेरी पदवी, सहपदवी आदी प्रकारचे अभ्यासक्रम राबविण्याचा मनोदयही आहे. राष्ट्रीय अप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीमच्या (NATS) अंतर्गत अभियांत्रिकी पदवी व पदविका धारकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 3000 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. राष्ट्रीय संशोधन फौंडेशनच्या माध्यमातून संशोधन विकासासाठी पुढील पाच वर्षांत सुमारे 50 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून अर्थमंत्र्यांनी या क्षेत्राला मोठी गती देण्याचा प्रयत्न केला आहे. अवकाश संशोधन व सागरी संशोधनासाठीही भरीव तरतूद केल्याने या क्षेत्रातील संशोधनासही मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.
Trending
- Sangli : इस्लामपुरात गुंडाचा डोक्यात शस्त्राचे वार आणि दगड घालून खून
- Ratnagiri : रोहा डाय कंपनीच्या गोदामाला भीषण आग; एक गंभीर जखमी
- महिलांच्या छेडछाड प्रकरणी ‘झेपटो’च्या मॅनेजरसह 4 ते 5 डिलिव्हरी बॉयवर गुन्हा
- Kolhapur Breaking : कोल्हापूर जिल्हात दंगलीच्या पार्श्वभुमीवर 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद
- ‘कांदळवन व सागरी जैवविविधते’साठी 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- वाघोली तलाठी कार्यालयातील मतदनीसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
- कोल्हापुरातील दगडफेकीचा ग्रामीण भागात निषेध; गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा आणि सांगरूळात कडकडीत बंद
- ‘बिद्री’वर प्रशासक आणणार नसल्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही