नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरांची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत पूर्वीप्रमाणेच संबंधितांना या योजनांवर व्याज मिळत राहणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर गुंतवणुकदारांना 7.60 टक्के व्याज दर मिळत राहणार आहे. तर नॅशनल स्कीम सेव्हिंगवर 6.8 टक्के व्याज मिळेल. पीपीएफवर 7.1 टक्के व्याज प्राप्त होईल. किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास 6.9 टक्के व्याज देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7.4 टक्के व्याज मिळणार आहे. मागील दोन तिमाहींपासून या योजनांवर मिळत असलेले व्याज पुढील तीन महिन्यांपर्यंत मिळणार आहे.
Previous Articleअखेर ‘मुक्त’ झाली ब्रिटनी स्पियर्स
Next Article लावा इंटरनॅशनलचा येणार आयपीओ
Related Posts
Add A Comment