न्यायालयाने ठरवले दोषी
प्रतिनिधी /कोल्हापूर
घड्याळ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. भागोजी विठ्ठल बाऊदने (वय ३७, रा. अष्टविनायक गल्ली, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग (१) एस. आर. पाटील यांनी त्याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सूनवली. सरकारी वकील म्हणून अॅड. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की 4 नोव्हेंबर 2019 मध्ये अल्पवयीन मुलीस नवीन घड्याळ देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी भागोजी बाऊदने यास अटक केली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.