अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा : परिवहनचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बसस्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे बसचालकासह प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सुविधांपेक्षा असुविधांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. बसस्थानकातील अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाल्याने ये-जा करणे कठिण झाले आहे.
बसस्थानकाच्या आवारात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यातच अवकाळी पावसाने जोर वाढविल्याने आवारात दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डबक्मयातून पाणी साचून असल्याने समोरून बस गेल्यास पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. तसेच प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे.
अंतर्गत भागाची दुरवस्था झाली असली तरी परिवहनने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अनलॉकनंतर प्रवाशांबरोबर बसफेऱयांची संख्या देखील वाढली आहे.
स्थानिक व लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांचीही वर्दळ अधिक आहे. मात्र बसस्थानकात पावसाने दलदल निर्माण झाल्याने ये-जा करणाऱया प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान बसस्थानकाच्या कामासाठी माती टाकण्यात आली आहे.
त्यातच जोरदार पाऊस झाल्याने बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिवहनने तातडीने दखल घेऊन अंतर्गत भागाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.