कोरोना संसर्गात उपचार करताना अनेक दुष्परिणाम दिसून आले आहे. यात प्रामुख्याने यकृतावर होणार्या परिणामाचाही उल्लेख करावा लागेल. एखाद्याचे यकृत अशक्त असले तर कोविड संक्रमणानंतर त्याची स्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असते.
संसर्ग हा जीवघेणा आजार ठरला आहे. यामुळे जगभरात लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अर्थात बहुतांश रुग्णांत कोरोनाचे किरकोळ लक्षणे दिसून येतात. परंतु एखाद्याला आधीपासून एखादा आजार असेल तर संसर्गाचे गांभीर्य अधिकच वाढते.
याशिवाय आणखी काही गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. त्यानुसार यकृताचे आजार असणार्यांना किंवा यकृत कमजोर असणार्यांना कोरोना झाल्यास गंभीर स्थिती होण्याची शक्यता अधिक राहते.
सेंटर फॉर प्रिव्हेंशन अँड डिसिजच्या मते, कोविडमुळे रूग्णालयात भरती झालेल्या काही रुग्णांत लिव्हर एंजाइमच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. म्हणजे एलेनिन एमिनोट्रांस्फरेज आणि एस्पार्टेट एमिनोट्रांस्फरेज. याचा अर्थ आजाराच्या काळात एखाद्या व्यक्तीचे यकृत हे अधिक खराब होणे.
हेपेटायटिज बी किंवा सी असल्यास : सीडीसीच्या मते, ज्या मंडळीत पूर्वीपासूनच लिव्हर डिसीज जसे की हेपेटायटिझ बी किंवा हेपेटायटिझ सी असेल तर कोविडमुळे आणखी अडचणीत भर पडू शकते. अशावेळी प्रकृती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांनी योग्य निदान करून त्यावर वेळीच उपचार केले तर प्रकृती स्थिर राहू शकते.
यकृताचा कर्करोग असल्यास : हेपेटायटिज बी किंवा सी चा सामना करणार्या लोकांना हेपेटोसेलुलर कार्सिनोमा (यकृत कर्करोगाचा प्रकार) होऊ शकतो. अशा स्थितीत केमोथेरेपीनंतर कमी प्रतिकारशक्ती राहत असल्याने रुग्णांत संसर्ग होण्याची शक्यता अधिक राहते. कोरोना झाल्यानंतरही अशीच स्थिती निर्माण होऊ शकते.
काळजी कशी घ्यावी ?
अन्य व्यक्तीप्रमाणेंच हेपेटायटिज बी किंवा हेपेटायटिज सी असणार्या लोकांनी आरोग्यदायी राहण्याबाबत सजग राहवे. एखाद्याला हेपेटायटिज बी/सी असेल आणि कोरोना संसर्गाचा उपचार सुरू असेल तर औषधोपचार नियमित ठेवावेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करावे.
लक्षात ठेवा
सीडीसीने हेपेटायटिज ए, हेपेटायटिज बी आणि इन्फ्लूएंजा (फ्लू) पासून वाचण्यासाठी लस घेण्याचा सल्ला दिला आहे. कोविडपासून बचाव करण्यासाठी लस घेणे हा चांगला मार्ग आहे. लस घेतल्यानंतरही कोविड गाइडलाइनचे पालन करायला हवे. सकस आहार करावा आणि मद्यपान करु नये.