बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेली ईशा कोप्पीकर चव्वेचाळीस वर्षांची आहे. मात्र या वयातही ती फिट आहे. नियमित योगासनं हेच ईशाच्या फिटनेसचं रहस्य आहे. ईशाने मध्यंतरी इन्स्टावर काही फोटो पोस्ट केले होते. यात ती योगा करताना दिसते आहे. ईशाच्या आवडत्या योगासनांविषयी जाणून घेऊ.
- ईशाने नटराजासन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या आसनामुळे पाठीच्या कण्याला बळकटी मिळते. तसंच पायांचे स्नायूही लवचिक होतात.
- चक्रासनही खूपच उपयुक्त आहे. हे आसन करताना आपलं संपूर्ण कसब पणाला लागतं. या आसनामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
- ईशा गरूडासन करताना दिसते. हा सुद्धा कठीण असा योग आहे. हे आसन रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतं.
- अर्धमत्स्येंद्रासन करताना श्वासांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. हे आसन शरीराची क्षमता वाढवतं.
आपण गेली अनेक वर्षं योगा करत असून बाळंतपणानंतरही फिटनेस जपता येतो, असं ईशा सांगते. मेहनत आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही असं ती सांगते. फिटनेसचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शरीराला अनेक आव्हानं द्यायला हवीत. शरीराला सज्ज करायला हवं. कोणत्याही गोष्टीची सुरूवात महत्त्वाची असते. ती झाली की सगळंच साध्य होतं, असा संदेश ईशा देते.