सध्या फ्लोरल्सचा जमाना आहे. फ्लोरल टॉप्स, कुर्ते, पँट्सची चलती असते. यासोबतच सध्या फ्लोरल प्रिंटवाल्या साडय़ांची क्रेझही वाढते आहे. फ्लोरल प्रिंटच्या साडय़ा दिसतातही खूप छान. तुम्हीही फ्लोरल प्रिंटवाल्या साडय़ा नेसणार असाल तर या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.
- फ्लोरल प्रिंटवाली साडी विशेष प्रसंगासाठी नेसायची असेल तर तिचे काठ चांगले असायला हवेत. बॉर्डरला जरी, मणी किंवा खडय़ांचं वर्क केलेली साडी घ्यायला हरकत नाही. यासोबतच शिमरींग जरी वर्कवाली साडीही घेता येईल.
- फ्लोरल प्रिंट साडीसोबत ट्रेंडी ब्लाउज कॅरी करा. प्रिंटेड साडीवर प्लेन ब्लाउज घालण्याऐवजी मॅचिंग फ्लोरल प्रिंटवालं ब्लाउज घालायला हरकत नाही. तुम्ही स्लीव्हलेस किंवा टय़ूब स्टाईल ब्लाउजही घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छानसा ब्लाउज शिवून घेऊ शकता.
- साडीसोबतच्या ऍक्सेसरीजनाही खूप महत्त्व असतं. तुम्ही कॅज्युअल ऑकेजनसाठी ही साडी नेसणार असाल तर मोजकेच दागिने घाला. लग्न किंवा समारंभाला ही साडी नेसणार असाल तर स्टेटमेंट ज्वेलरी घालता येईल. एखादा चोकर आणि स्टड्स शोभून दिसतील.
- तुम्ही ऑकेजनप्रमाणे मेक अप करू शकता.
- फ्लोरल प्रिंटेड साडीवर वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स शोभून दिसतात. मात्र तुम्ही अशा साडीवर छानसा अंबाडा घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फ्लोरल साडीमध्ये मिरवू शकता.