ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील आंबवणे येथील संपर्क संस्थेच्या बाल आशाघरातून पाच मुले बेपत्ता झाली आहेत. या मुलांना फूस लावून पळवल्याचा आरोप होत असून, पौड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीपती लहु मोरे (वय 11), गणपत भुरीया उघडे (11), सागर वाघमारे (12), अभिषेक गायकवाड (17) आणि नवनाथ पाटोळे (16) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. यापैकी दोन मुले अनाथ आहेत. 25 जानेवारीच्या संध्याकाळपासून ही मुले गायब आहेत. बेपत्ता मुलांना कुणीतरी फुस लावून पळवल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. मुलांबाबत माहिती मिळाल्यास पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आली आहे.
