वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या महबूबनगरच्या एका गावात खळबळ उडाली आहे. सरपंचाने काही दिवसांपूर्वी 4 हजार लोकांना आंब्याचं लोणचं वाटलं होतं. परंतु लोणच्याची विक्री करणारा व्यापारी आणि आचारी कोरोना बाधित असल्याचे आता समोर आले आहे. या कारणामुळे 100 ग्रामस्थांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणूच्या फैलावाची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत असताना कोल्लूरमध्ये विषाणूच्या भीतीने दुकानेच बंद करण्यात आली आहेत. ग्रामस्थांनी संसर्गाच्या भीतीपोटी लोणचं देखील फेकून दिलं आहे. 112 ग्रामस्थ स्वतःच्या घरांमध्ये कैद आहेत. अद्याप कुठलाच ग्रामस्थ कोरोनाबाधित आढळला नसल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय तसेच आरोग्य अधिकारी डॉ. के कृष्णा यांनी दिली आहे.
दुसऱया गावचा होता व्यापारी
महिला सरपंच आणि तिच्या पतीने गावातील सर्व घरांमध्ये लोणचं वाटण्याची योजना आखली होती. लोणचं तयार करणाऱया व्यापाऱयाला भेटण्यासाठी ते शादपूर येथे गेले होते. व्यापाऱयाने लोणचं तयार करण्यासाठी दोन आचाऱयांची व्यवस्था केली होती. या दोन्ही आचाऱयांनी गावातील 12 जणांच्या मदतीने आंब्याचं लोणचं तयार केलं होत. व्यापारी आणि एक आचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच ग्रामस्थांची झोपच उडाली आहे.