बेळगाव : जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने बँकांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. गुरुवार दि. 22 एप्रिल ते 30 मेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच बँका खुल्या राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना दुपारी 2 पर्यंतच आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. ग्राहकांनी बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शिखर बँकेतर्फे करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 50 टक्के कर्मचाऱयांना कामावर बोलाविण्यात येणार आहे. ग्राहकांसाठी बँक जरी दुपारी 2 पर्यंत खुली असली तरी अंतर्गत व्यवहार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्राहकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखूनच बँकांमध्ये प्रवेश करावा, असे आवाहन केले आहे.
Previous Articleजिल्हय़ात सक्रिय रुग्णसंख्या दीड हजारांवर
Next Article स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्याचा निर्णय
Related Posts
Add A Comment