तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
शेळगाव (ता. बार्शी) येथे तरूणाने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वैराग पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेळगाव (ता. बार्शी) येथील अमोल शशिकांत पवार (वय ३०) या युवकाने आजारपणाला कंटाळून व तणाव आल्याने राहत्या घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद वडील शशिकांत बाबू पवार यांनी वैराग पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल हेळे हे करत आहेत.