प्रतिनिधी प्रज्ञा मणेरीकर
पणजी: २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर्स दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो. अल्झायमर आजारावर उपचार हा २१ व्या शतकाच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राथमिकतेत स्पष्ट झाला आहे. त्यामुळे डिमेंशिया म्हणजे काय आणि समुदायावर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी डिमेंशियाबद्दल बोलूया हि थीम यंदाच्या अल्झायमर्स दिनसाठी निवडण्यात आली आहे. राज्यात यंदा या दिनाचे २0 वे वर्ष साजरे होत आहे.
२०५० मध्ये १५० दशलक्ष संख्या होण्याचा अंदाज
‘‘दर तीन सेकंदात डिमेंशियाच्या एका नवीन प्रकरणात वाढ होताना दिसत असून हा आजार जगातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्यसमस्या म्हणून बनत आहे. ‘डिमेंशिया इंडिया रिपोर्ट‘‘ नुसार एकट्या भारतातच अंदाजे ४ दशलक्ष लोक स्मृतिभ्रंश आहेत. अल्झायमर डिसीज इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालानुसार जगभरात अंदाजे ५0 दशलक्ष लोक डिमेंशियाग्रस्त आहेत. २०५० मध्ये हि संख्या अंदाजे १५० दशलक्षपर्यंत वाढेल. बहुतेक हि वाढ विकसनशील देशांमध्ये होईल असा अंदाज केला जात आहे. गोव्यात सुमारे ५000 डिमेंशियाचे रूग्ण आढळून आले आहेत. ज्यात ६0 टक्के हे अल्झायमरचे रूग्ण आहेत. अल्झायमर आणि या आजाराशी निगडीत असलेल्या आजारांवर लक्ष केंद्रीत करून त्याबाबत जागृती करणे गरजेची आहे अशी माहिती गोवा मेडिकल कॉलेजच्या प्रिव्हेंटिव अँण्ड सोशल मेडिसीन विभागाचे डॉ. अमित डायस यांनी दिली.
वृद्धांच्या प्रमाणाबरोबरच वाढतेय डिमेंशियाचे प्रमाण वृद्धांची संख्या जसजशी वाढतेय तसतशी डिमेंशियाच्या रुग्णात वाढ होत आहे. सध्याच्या कोविड १९ हा आजार अशा लोकांसाठी एक मोठा धोका मानला जात आहे. कारण अशाप्रकारच्या लोकांना सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता आणि मास्क वापरण्याचे नियम लक्षात ठेवणे अवघड आहे. त्यामुळे या आजाराला बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.
सुमारे ८0 टक्के स्त्रिया या काळजीवाहू बहुतेक काळजी घरबसल्या आणि कौटुंबिक काळजीवाहूंकडून केली जाते. सुमारे ८0 टक्के काळजीवाहू स्त्रिया आहेत आणि ५० टक्के काळजीवाहू पती-पlनी असून ज्यात ते स्वतः वृद्ध आहेत आणि त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे.
डिमेंशियाविषयी जागरूकता करण्यासाठी वेळ आवश्यक लोकांना बर्याचदा असे वाटते की हे सामान्य वृद्धत्व आहे त्यामुळे या पारिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. डिमेंशियाविषयी बोलण्यासाठी आणि जागरूकता वाढविण्यासाठी वेळ घालविणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला अल्झायमर रोग आणि डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी शिक्षण, शारीरिक क्रियाकलाप आणि सामाजिक संपर्क वाढविणे आवश्यक आहे. याशिवाय उच्च रक्तदाब, धूम्रपान, नैराश्य, मधुमेह,मद्यपान, यासारखे घटकांचा वापर कमी करणे आवश्यक आहे कारण सदर घटक डिमेंशिया होण्याचे जोखमीचे घटक म्हणून ओळखले जातात.
स्मृती समस्या व गोंधळ हे प्राथमिक लक्षण
वृद्धांमध्ये स्मृती समस्या आणि गोंधळ हे या आजाराचे प्राथमिक लक्षण मानले जाते. जर अशाप्रकारचे लक्षण दिसून आले तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे उत्तम. डिमेंशियासाठी अनुकूल समुदाय, वातावरण निर्माण करणे आणि त्या दिशेने पाfहले पाऊल म्हणजे या स्थितीबद्दल जागरूकता वाढविणे हे ध्येय आहे. अलीकडील स्मृतिभ्रंश (नुकतीच झालेली एखादी गोष्ट विसरणे. उदा. पाच मिनिटांपूर्वी केलेला नाश्ता विसरणे.) पारिचित कामे करण्यात अडचण, भाषेतील समस्या येणे, भाषा योग्य प्रकारे बोलता न येणे, वेळ आणि ठिकाणी विसंगती,काय करावे आणि केव्हा करावे हे त्यांना कदाचित ठाऊक नसणे, वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवणे, गोष्टींचा मागोवा ठेवण्यात समस्या, मूड आणि वागणुकीत बदल, चित्रे, चिन्हे समजण्यास असक्षम, सामाजिक क्रियाकलापांपासून, लोकांपासून दूर राहणे, लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा नसणे सदर डिमेंशियाच्या 10 चेतावणी लक्षणे असून याविषयी प्रत्येकाला माहिती असले पाहिजे असे डॉ. अमित डायस यांनी सांगितले.