ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेली ‘NEET 2020’ परीक्षा आज (रविवार) पार पडत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 46 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दुपारी 2 ते 5 वेळेत ही परीक्षा होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते 1.30 या वेळेत परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे.
राज्यभरातून 2 लाख 28 हजार 914 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी 695 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जाड सोलचे बूट, मोठ्या बटनांचे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थ्री प्लाय मास्क देण्यात येतील. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 6 फुटांचे अंतर असेल.
परीक्षेचे मूळ ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई आणि मुंबई उपनगरातून लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.