मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईच्या लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण केंद्रे बंद करण्याची घोषणा शनिवारीच पालिकेने केली. तसेच सोमवारी केंद्रे उघडण्याबाबतची माहिती रविवारी ट्विटद्वारे दिली जाईल असेही सांगण्यात आले. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, लसीची कमतरता असल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली नसून रविवार असल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महाननगर पालिकेनं ट्वीट करत म्हटले आहे की, प्रिय मुंबईकरांनो..रविवारी शहरात लसीकरण बंद असणार आहे. आम्ही आशा करतो की, तुम्ही रविवारचा आनंद घ्याल. सोमवारच्या लसीकरणासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून आणि सदर प्रभागांमधूनही देण्यात येईल.
शनिवारी मुंबईत 1283 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 52 जणांनी या संसर्गामुळं जीव गमावला. मुंबईचा कोरोना प़ॉझिटीव्हीटी रेट हा 0.2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांसाठी ही बाब मोठा दिलासा देणारी ठरत आ