बेंगळूर : राज्यात आणखी नऊ मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार यंदापासून सदर महाविद्यालय सुरू करण्यात येतील, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. दावणगेरे येथे पत्रकारांशी ते बोलत होते. खासगी भागीदारीतून ही महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार दावणगेरेसह 9 जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित होतील. तसेच ज्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्यांना राज्य सरकार जमीन देईल, अशी माहितीही सुधाकर यांनी दिली.
Previous Articleबांधकाम कर्मचाऱयांना मिळणार मोफत बसपास
Next Article नूतन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पदभार स्वीकारला
Related Posts
Add A Comment