कोरोनाच्या संकटात अनेक व्यवसायांचं आर्थिक नुकसान होत असताना फॅशन क्षेत्राला मात्र यशाचं गुपित सापडलं आहे. कोरोनामुळे मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे फॅशन क्षेत्रात काम करणार्या कंपन्या वैविध्यपूर्ण मास्क तयार करण्यात गुंतल्या आहेत. आकर्षक आणि हटके मास्कना चांगलीच मागणी आहे.
आता आपल्या व्यक्तीमत्त्वानसार किंवा कपडय़ांच्या रंगसंगतीनुसार मास्क खरेदी करण्याचा ट्रेंड येऊ लागला आहे. मास्कवर कार्टून, हॅशटॅग, कोट्स, मार्व्हल सिरीज, भौमितिक आकृत्या, डूडल आदी रचना निसून येतात. येवढंच नाही, तर त्यावर आपल्या चेहर्याचा फोटो छापून देणाचाही ट्रेंड सुरू झाला आहे. वरच्या बाजूला
फेस शील्डसारखं प्लास्टिक शीट असलेले मास्कही तयार केले जात आहेत. मास्कची किंमत अगदी 20 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत आहे. तान्हं बाळ, लहान मुलं आणि मोठय़ांसाठी अशा आकारांमध्ये ते उपलब्ध आहेत.

एन 95 मास्कना मोठी मागणी असल्यामुळे ते देखील रंगीत चित्रांमध्ये उपलब्ध आहेत. यापुढे जाऊन तयार कपडे विकत घेताना मॅचिंग मास्क पुरवण्याचाही विचार केला जात आहे. मास्क सुती, लिनन, डेनिम चिनो, गॅबार्डिन अशा कापडापासून बनवले जातात. 3 ते 4 थरांचेहे मास्क प्रिंटेड कापडापासून बनवतात किंवा चित्रकार त्यावर हँडपेंट करतात. काही वेळा त्यावर डिजिटल प्रिंटिंगही केलं जातं.