बेळगाव / प्रतिनिधी
पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत बसपास देणे देखील परिवहनला बंधनकारक आहे. मात्र बसपासची प्रक्रिया बदलली असून आता विद्यार्थ्यांना ऑनलाईद्वारे बसपास मिळवावे लागणार आहेत. त्यासाठी सेवा सिंधू या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. ही सुविधा कर्नाटक वन कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वी बसपास मिळविणे सोपे होते मात्र आता ऑनलाईन नोंदणी सक्तीची केल्याने सेवा सिंधूमार्फत बसपास काढावा लागणार आहे. सध्या 10 डिसेंबरपर्यंत विद्यार्थी जुना बसपास दाखवून प्रवास करू शकतात. मात्र 10 डिसेंबरनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे बसपास मिळवावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे.
यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयात जमा करून नंतर ते परिवहनच्या पास वितरण केंद्रात पाठविले जात होते. त्यानंतर केंद्रात बसपास तयार करून ते महाविद्यालयांकडे पाठविले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त तसदी घ्यावी लागत नक्हती. मात्र आता विद्यार्थ्यांना सेवा सिंधूच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे बसपास मिळवावा लागणार असल्याने अधिक धावपळ करावी लागणार आहे.