शहर वार्ताहर/ राजापूर
कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे शाळाही बंद होत्या. यामुळे अनेक शाळांमधील वीज बीले थकीत राहीली. आता या विद्युत बीलांचा भार राज्य सरकारने उचलला आहे. याकरीता थकीत बीले सादील अनुदानातून खर्च करण्याची मंजूरी देण्यात आली आहे. याकरीता 5 कोटी 88 लाख 63 हजार रूपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे. राज्यात बीड जिल्हयातील 320 शाळांमधून 83 लाख 66 हजार रूपये म्हणजे सर्वात जास्त थकीत आहे. तर सिंधूदुर्ग जिल्हातील 78 शाळांमधून 31 हजार रूपये थकीत म्हणजे सर्वात कमी थकीत देयक आहे. रत्नागिरी जिल्हयाचा विचार करता 327 शाळामधील 1 लाख 57 हजार थकीत आहेत. विद्युत बीलासाठी सादिल अनुदानामधून खर्च करण्यात येणार असल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शाळांमधील वीज बीले पुर्वी 4 टक्के सादिल अनुदानातून भरण्यात येत होती. मात्र शासनाने सादिल अनुदानातून वीज बीले न भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. शाळांमधील वीज बीले भरणार कशी असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहीला. या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून ही बीले भरणा केली. तर काही शाळांमधील शिक्षकांनी व पालकांनी पैसे काढून बीले भरली यामुळे पालकांवर ही बीलांचा भार पडु लागला. दरम्यान कोरोना महामारीने उचल खल्याने सर्वच व्यववाहर ठप्प झाले होते. त्यामध्ये शाळाही बंद होत्या. मात्र काही महिन्यांनतर शाळा सुरू करून ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरूवात केली. शाळा बंद असलेल्या कालावधीपासूनची बीले शाळांना विद्युत वितरण कंपनीने दिली असल्याने सर्वासमोर पेच निर्माण झाला, या संदर्भात अनेक तक्रारी सरकार दरबारी करण्यात आल्या. त्याची दखल शासनाने घेऊन थकीत बीले सादिल अनुदानातून भरण्याची मंजूरी दिली व निधीही उपलब्ध करून दिला आहे,
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानी चालविलेल्या प्राथमिक शाळांकरीता भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहीत्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चावर 4 टक्के खर्च सादिलवार खर्च करण्याची मान्यता शोलय शिक्षण व क्रीडा विभागाने दिली आहे. सादिल अनुदानातून खर्च करण्याच्या अनुज्ञेय बाबीमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार शाळांमधील वीज बील इतर निधीतून भरण्यात आले नसल्यास सादिल अनुदानातून भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रती शाळा प्रति महिना 1 हजार रूपयांप्रमाणे भरण्याची मुभा दिली आहे.
विद्युत वितरण कंपनीने शाळाची विज देयकांची थकीत रक्कम 6 कोटी 8 लाख 4 हजार व कायम स्वरूपी बंद वीज देयकाची थकीत रक्कम 5 कोटी 88 लाख 63 हजार रूपये अशी 11 कोटी 97 लाख 3 हजार असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला असून राज्यातील जिल्हा परीषद शाळांमधील कायमस्वरूपी बंद वीज देयकांची थकीत रक्कम अदा करण्याकरीता सन 2020/21 या वर्षाकरीता सादिल अनुदानातून 5 कोटी 88 लाख 63 हजार रूपये इतकी रक्कम फक्त वर्षापुरती अदा करण्यास एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आली आहे. राज्यात बीड जिल्हयातील 320 शाळांमधून 83 लाख 66 हजार रूपये म्हणजे सर्वात जास्त थकीत आहे. तर सिंधूदुर्ग जिह्यातील 78 शाळा मधून 31 हजार रूपये थकीत म्हणजे सर्वात कमी थकीत देयक आहे. आहे. रत्नागिरी जिल्हयाचा विचार करता 327 शाळामधील 1 लाख 57 हजार थकीत आहेत. शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याने शिक्षक व पालकांना होणारा आर्थिक भुर्दंड कमी झाला आहे. शासनाच्या या उपक्रमाचा सर्वच आभार मानण्यात येत असून विद्युत बीलासाठी सादिल अनुदानामधून खर्च करण्यात येणार असल्याने शाळांना व पालकांना दिलासा मिळाला आहे.