राज्य सरकारचा निर्णय, 70 लाख रुपयाची मर्यादा किंवा मुळ पगाराच्या 100 पट रक्कम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य शासकिय कर्मचाऱयांच्या घरबांधणी अग्रीमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने घराच्या †िकंमती मर्यादेत सुधारणा केली आहे. मुळ वेतनाच्या 100 पट किंवा 70 लाख रुपयांपर्यत मर्यादेत रक्कम देण्याविषयी निर्णय घेतला आहे.
अलीकडे राज्यसरकारच्या वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. जमीन खरेदी करुन त्यावर विहीत कालावधीत घर बांधणे किंवा स्वताच्या जागेवर घर बांधणे अथवा स्वताचे जुने घर पाडून नवे घर बांधणे किंवा नवीन तयार घर खरेदी करणे यासाठी अग्रीम रक्कम देण्याचे ठरवण्यात आले आहे. मुळ वेतनाच्या 100 पट किंवा एक्स वर्गीकरण्याच्या क्षेत्रासाठी 70 लाख, वायसाठी 50 लाख व झेड साठी 40 लाख रुपये एवढी मर्यादा अग्रीमासाठी घालून देण्यात आली आहे.
घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करताना मुळ वेतनाच्या 100 पट अथवा एक्स मध्ये 21 लक्ष, वाय मध्ये 15 लक्ष किंवा झेड मध्ये 12 लक्ष एवढी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
राहत्या घराचे नवीन घरामध्ये विस्तार करण्यासाठी अशीच मर्यादा घालून देण्यात आली आहे. असाधारण व विशेष दुरुस्तीसाठी रकमांची तरतूद करण्यात आली आहे. गृहकर्ज घेतले असल्यास त्याची फेड देखील अग्रीमातून करता येणार आहे. वेतनातून विशिष्ट हप्त्याद्वारे शासकिय तिजोरीत जमा होणार आहे. किमान 5 वर्षे सेवा झाली असली पाहिजे किंवा 5 वर्षे एवढे काळ सेवा शिल्लक असली पाहिजे. घराच्या किंमतीएवढा विमा उतरवला गेला पाहिजे. पती पत्नी दोघेही शासकिय कर्मचारी असतील तर त्यापैकी एकालाच अग्रीम मिळेल.
अर्जदाराच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावर भारतात कोठेही घर अथवा जमीन खरेदी करायची असल्यास विशिष्ट कार्यपद्धती अवलंबण्यात येईल. दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या अर्जदारास हा लाभ मिळणार नाही. असे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.