पुणे / प्रतिनिधी :
‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे (लाईव्ह वेबिनार) आयोजन करण्यात आले आहे.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए स्थापना दिवसाच्या निमित्त हे व्याख्यान होणार आहे. आज (बुधवार) सकाळी १० ते ११ या वेळेत अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम www.youtube.com/puneicaiofficial यावरुन लाईव्ह प्रसारित होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारत’ कसा घडवायचा, तसेच आत्मनिर्भर व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे आदींबाबत धर्माधिकारी आपल्या विवेचनात मांडणार असल्याचे धामणे यांनी कळविले आहे.