मुंबई/प्रतिनिधी
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणार्या मानसेवी डॉक्टरांनी निराश असल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल २८१ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी केली आहे.
दरम्यान स्वप्निल लोणकरसारखे आम्ही पुरते निराश असल्याची भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल २८१ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी केलीय.
जवळपास दोन दशकांपासून हे सर्व बीएएमएस डॉक्टर १६ आदिवासी जिल्ह्यात दुर्गम भागातील गावांमध्ये तसंच जिथं रस्तेही पोहोचत नाहीत अशा पाडे आणि वस्त्यांवर जाऊन रुग्णसेवा करत आहेत. गरोदर माता तसंच कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीपासून किरकोळ आजारांवर उपचार हे डॉक्टर करतात. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र, आम्हा डॉक्टरांना वेठबिगारासारखे २४ हजार रुपये मानधनावर राबावे लागते, अशी व्यथा या २८१ डॉक्टरांच्या भरारी पथकातील डॉ शेषराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.

मानधनवाढीचा निर्णय, अंमलबजावणी नाही
कोरोना संकटाच्या काळात गेल्या दीड वर्षात गावखेड्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी आम्ही काम केलं आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ डॉक्टर त्यांना गरज असेल तिथं आमच्याकडून काम करून घेतात. मात्र, साधी माणुसकीही भरारी पथकाच्या आम्हा डॉक्टरांना दाखवली जात नाही, अशी खंतही सुर्यवंशी यांनी व्यक्त केलीय. १० महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आदिवासी मंत्र्यांकडील बैठकीत आदिवासी जिल्ह्यात काम करणाऱ्या भरारी पथकाच्या २८१ डॉक्टरांचे मानधन २४ हजारावरून वाढवून ४० हजार करण्याचा निर्णय घेतला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे रिक्त आहेत. दुर्गम आदिवासी जिल्ह्यात काम करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टर फिरकतही नाहीत तरीही दोन दशकांपासून हंगामी पद्धतीने काम करणाऱ्या आम्हा डॉक्टरांना सेवेत कायम करायला सरकार तयार नाही, असंही या भरारी पथकाच्या डॉक्टरांचे म्हणणं आहे.