बेंगळूर : कर्नाटक आपत्कालीन मदतनिधी 500 कोटी रुपयांवरून 2500 कोटी रुपयांवर वाढविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. विधानसभेमध्ये सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना गृहमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, कर्नाटक आपत्कालीन मदतनिधी 500 कोटी रुपयांवरून 2,500 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. कोरोना असल्यामुळे पुढील दिवसात खर्च करण्याच्या उद्देशाने आपत्कालीन मदतनिधी वाढविण्यात आला आहे. गेल्यावषी राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आपत्कालीन मदतनिधी 80 कोटीवरून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढविला होता. आपत्कालीन मदतनिधी वाढविल्याने आर्थिक संकटात असलेल्यांना पॅकेज घोषित करण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Previous Articleयंदा 25 लाख घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा
Next Article मंगळवारी दिवसभरात 8,111 जणांना डिस्चार्ज
Related Posts
Add A Comment