ऑनलाईन टीम / मुंबई :
क्रिकेट भक्तांचा ‘देव’ आणि भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज वयाची 47 वर्ष पूर्ण केली. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजची त्याचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. सचिन मैदानात नसला तरी अजून ही चाहत्यांच्या ह्रदयात कायम कोरला गेलेला आहे.
कोणी त्याच्या नावाचे टॅटू काढतं, तर कोणी त्याच्यासाठी सायकल ने प्रवास करतो. त्याचे चाहते त्याच्या प्रेमापोटी काही ना काहीतरी करत असतात. असाच एक त्याचा चाहता म्हणजेच अभिषेक साटम हा दरवर्षी त्याच्या वाढदिवशी काही ना काही कलाकृती करून त्याचा वाढदिवस साजरा करतो. यावर्षी सचिनने ही कोरोना संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसचं या संकटामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोठं आर्ट वर्क करता येणार नाही म्हणून अभिजित थोडा नाराज होता. पण अभिषेक ने थोडा विचार करत घरात ज्या वस्तू आहेत त्यातूनच कलाकृती तयार केली आहे. ज्यातून त्याने कोरोना ला फटकाविण्याचा संदेश दिला आहे.
यावर्षी अभिषेकने सचिनच्या पूल शॉट चं आर्ट बनवले आहे. यामध्ये त्याने बॉलच्या जागी कोरोना दाखवला आहे. सचिन जशी क्रिकेटच्या मैदानात बॉलर्सची धुलाई करतो, तशी आपल्याला कोरोनाशी लढाई करायची आहे. असा संदेश या चित्रातून देण्यात आला आहे.
अभिषेक ने बनवलेले हे पोट्रेट 5.6 बाय 3 फुटाचे असून फाईट अगेंस्ट कोरोना अशी याची थीम आहे. यामध्ये अभिषेकने अर्ध्या इंचाचे 9 हजार 636 चौकोनांचा वापर केला आहे. यासाठी त्याने काळा, निळा, पिवळा, पांढरा, लाल, पोपटी आदी रंगांचा वापर केला आहे. हे पोर्ट्रेट तयार करण्यास अभिषेक का 15 तासांचा अवधी लागला.