विविध समस्यांची घेतली माहिती : संबंधित अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी दूरदर्शननगर (टी. व्ही. सेंटर) ला नुकतीच भेट दिली. अव्यवस्थित व अपुरा पाणी पुरवठा, खराब रस्ते, गटारी, उद्याने, विद्युत पुरवठय़ाची समस्या, पथदीप संदर्भातील माहिती व समस्यांचे निवेदन रहिवाशांनी आमदारांना दिले.
एल अँड टीचे अधिकारी महादेव, उद्यान विभागाचे रिझवान, पथदीप समस्येसाठी संबंधित साहाय्यक इंजिनियर सुनिल नरसण्णावर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. गणपती देवस्थानच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अनिल बेनके यांनी संबंधित अधिकाऱयांना सूचना देऊन कामाविषयी अहवाल देण्याचे आदेश दिले.
सदर कार्यक्रमाला ऍड. एम. एम. पाटील, कामतगी, मारुती कणबर्गी, ऍड. श्रीधर कुलकर्णी, ऍड. अजवान, एस. आर. गावडे, गोक्राळ, गुजर, राकेश करडी, कलुती तसेच इतर नागरिक उपस्थित होते. मारुती कणबर्गी यांनी सूत्रसंचालन केले. ए. एम. पाटील यांनी अनिल बेनके यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. समस्यांचे निवेदन व माहिती श्रीधर कुलकर्णी यांनी दिली. सविस्तर चर्चेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.