जुने गोवे / वार्ताहर : कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कुंभारजुवे मतदारसंघातील कार्यकर्ते, मतदार व युवावर्गाकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. जुने गोवे येथील कार्यालयात आमदारांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व मतदार यांनी उपस्थिती लावली होती. कुंभारजुवे मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी तसेच मतदारसंघातील युवा बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मतदार व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातरच आपण भाजप प्रवेश केला असून त्यासाठी मी वचनबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
Trending
- यू-17 आशियाई कपसाठी भारतीय फुटबॉल संघ जाहीर
- केरळमध्ये मान्सून उशीराने पोहोचणार, ७ जूनपर्यंत येण्याची शक्यता
- दुर्गमानवडमध्ये इचलकरंजी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची चौकशी होणार; जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर; मुख्यमंत्र्यांचा सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला दौरा निश्चित
- केरळमध्ये उशीराने पोहोचणार मान्सून, ७ जूनपर्यंत आगमनाची शक्यता
- सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता
- विलवडेत उदया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण