प्रतिनिधी
पणजी
मागील आठ वर्षांपासून गोवा मनोरंजन सोसायटीचे लेखापरीक्षण तसेच आयकर रिटर्न फाईल करण्यात आली नव्हती. परंतु आता हे लेखापरीक्षण झाले असून आयकर विभागाकडे १.५ कोटी रूपयांची परतफेड करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. उपाध्यक्षपदाचा पदभार घेण्यापूर्वी गोवा मनोरंजन सोसायटीचे लेखापरीक्षण करण्यात आले नव्हते. याशिवाय मागील पाच वर्षे नोंदणीचे नूतनीकरणहि करण्यात आले नव्हते. या दरम्यान आयकर विभागाच्या अनेक नोटीसा येऊ गेल्या. पदभार सांभाळल्यानंतर एक वर्षाच्याआत आठहि वर्षाचे ऑडिट घेण्याचे ठरविले. ऑडिट आता पूर्ण झाले आहे.याचबरोबर आयकर विभागाकडून रक्कमेची परतफेड करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. आयनॉक्स थिएटर उत्तम दर्जाचे बनविण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात सदर थिएटरचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यात उत्तम गुणवत्तेच्या सुविधा समाविष्ट करण्यात येणार आहेत. देशात तिसरे चांगले थिएटर म्हणून नावाजले जाणार आहे. ऑक्टोबर शेवट नूतनीकरणाचे कार्य संपणार असून नोव्हेंबर मध्यात थिएटर सुरू करण्यात येईल. आयनॉक्स नूतनीकरणात गोवा मनोरंजन सोसायटी किंवा राज्य सरकारने खर्च केला नसून आयनॉक्स कंपनीने खर्च केला आहे. २० लाख महसूल मिळत होता. आता ५४ लाख महसूल मिळणार आहे. १५ वर्षांचे कंत्राट संपुष्टात आल्यावर १ कोटी रूपये गोवा मनोरंजन सोसायटीला महसूल मिळणार आहे. तिकिटाच्या किमतीत काहि प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून सरकारकडे बोलून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुभाष फळदेसाई यांनी दिली. हायब्रिड इफ्फी असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक साधनांचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. काहि दिवसात गोवा मनोरंजन सोसायटीकडील इफ्फीसंदर्भातील जबाबदारी कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान