प्रतिनिधी /बेळगाव
आयटीपार्कसाठी स्थळ निश्चित करण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलाविण्याची मागणी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी यांनी ही मागणी केली
आहे. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य के. नारायण आदी उपस्थित होते.