ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) च्या गुरुवारी झालेल्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत होते.

दहा संघांचे आयपीएलमध्ये 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे.
यासह आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे. प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत. ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे.
त्यामुळे 2021 मध्ये आयपीएलमध्ये 8 संघ असतील तर 2022 च्या हंगामात 10 संघांचा समावेश असणार आहे.