बेळगाव : एसकेई संस्थेच्या राणी पार्वतीदेवी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनीनी 36 व्या कर्नाटक राज्यस्तरीय कनिष्ठ गटात विविध पारितोषिके पटकाविली. सदर स्पर्धा मुडबिद्री, दक्षिण कन्नड येथील ‘अल्वाज’ शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. ऐश्वर्या नेसरकरने तिहेरी उडी (11.17 मीटर) आणि लांब उडी (5.29 मीटर) या क्रीडाप्रकारात रौप्यपदक पटकाविले. शुभांगी काकतकरने 3000 मीटर धावण्यात रौप्य पटकाविले तर टिना वानखेडेने 5 किमी चालण्याच्या स्पर्धेत रौप्य मिळविले. सदर विद्यार्थीनी गुवाहाटी, आसाम येथे होणाऱया राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या विद्यार्थीनीना एसकेई संस्थेचे संस्थासंचालक पी. एम. शिवलकर, डी. बी. कलघटगी तसेच प्राचार्य के. बी. मेळेद व शारिरीक शिक्षण संचालक देवेंद्र कुडची व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
Previous Articleशेतकऱ्यांना मोठा दिलासा; तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार
Next Article वरदराज चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
Related Posts
Add A Comment