प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे विद्यार्थी कल्याण विभाग अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी केले. शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पूजन संस्थेचे क्हा. चेअरमन पंकज शिवलकर, कॉलेजच्या व्यवस्थापन कमिटीच्या क्हा. चेअरपर्सन बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्या डॉ. अचला देसाई, डॉ. शोभा नाईक, डॉ. राजेंद्र पोवार, डॉ. अभय पाटील, प्रा. एस. एस. शिंदे, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, डॉ. हरीश कोलकार, प्रा. प्रसन्ना जोशी, डॉ. सुनंदा कितली, डॉ. अजित कोळी, डॉ. एम. एस. कुरणे, डॉ. एस. एच. पाटील, प्रा. डॉ. एन. रामकृष्ण, अधीक्षक चिकमठ एम. एस., पी. यु. कॉलेजचे प्राचार्य के. बी. मेल्लद यांनीही शिवपुतळय़ाचे पूजन केले. विद्यार्थिनी प्रतिनिधी माधुरी बागवे यांनी शिवआरती व बहारदार पोवाडा सादर केला. आभार प्रा. विजयकुमार पाटील यांनी मानले. सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.