प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी महाविद्यालयाच्या आवारात धामण साप आढळला. यावेळी तेथे असलेल्या युनियन बँकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. यापूर्वीही त्यांनी या परिसरात एक साप पकडला असल्याचे सांगितले.
सोमवारी आरपीडी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या युनियन बँकेच्या मागील बाजूला धामण जातीचा साप असल्याचे काहीजणांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही माहिती युनियन बँकेचे सुरक्षारक्षक व निवृत्त सैनिक पांडुरंग कांबळे यांना दिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेऊन तो साप पकडला व त्याला जीवदान दिले. पांडुरंग कांबळे यांनी यापूर्वीही अनेक सर्प पकडले आहेत. त्यांनी त्यांना पकडून जंगलात सोडून दिले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.