नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी आपल्या आरोग्याचे कारण देत निवृत्तीच्या तीन महिने अगोदरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एन.एस. विश्वनाथन यांनी आरबीआयमध्ये 29 वर्षांचा सेवाकाळ येत्या 31 मार्चरोजी समाप्त होणार होता. परंतु त्या अगोदरच त्यांनी आपले पद सोडले आहे. एन. एस. विश्वनाथन यांच्या अगोदर डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी जून 2019 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जून 2016 मध्ये एच. आर. खान यांच्या जागी डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्त केले होते. त्यांना मागील वर्षातील जून महिन्यात एक वर्षासाठी पुनर्नियुक्त केले होते. या अगोदर ते आरबीआयमध्ये बिगर बँकिंग पर्यवेक्षण विभागात मुख्य जनरल मॅनेंजर म्हणून पदभार सांभाळला आहे.