प्रतिनिधी /पुणे
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड’च्या पुणे विभागीय कार्यालयाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सोमवारी भेट दिली.
लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मराठे यांचे स्वागत केले. यावेळी लोकमान्य सोसायटीच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक भालचंद्र कुंटे, असिस्टंट रिजनल मॅनेजर हर्षद झोडगे, लोकमान्य अर्थवार्ताचे सल्लागार संपादक योगेश्वर गंधे, सहकार भारतीचे भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी किरण ठाकुर यांनी सोसायटीच्या कामकाजाची व विविध उपक्रमांची मराठे यांना माहिती दिली. मराठे यांनीही कामकाज समजून घेत ‘लोकमान्य’च्या कामगिरीचे कौतुक केले.