प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी युजीसी मार्गसुचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठय़पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठात कुलगुरु एम. रामचदंगौडा व कुलसचिव बसवराज पद्मशाली यांच्या हस्ते करण्यात आले. अध्ययन मंडळाध्यक्ष डॉ. चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
पाठय़पुस्तकांचे संपादन व आरपीडी कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र पोवार, राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष व साहाय्यक संपादक प्रा. शंकरमूर्ती के. एन., संघाचे सेपेटरी व साहाय्यक संपादक डॉ. डी. एम. मुल्ला, डॉ. अमित चिंगळी व डॉ. महादेव संकपाळ उपस्थित होते.
डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी स्वागत केले व नवीन हिंदी पाठय़क्रम व पाठय़पुस्तकांबद्दल माहिती दिली. डॉ. राजेंद्र पोवार हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य असून त्यांनी हिंदी पाठय़क्रम वेळेत तयार केला. अन्य प्राध्यापकांच्या सहकार्याने पाठय़पुस्तकेही वेळेवर प्रकाशित झाल्याबद्दल व्हाईस चान्सलरनी सर्वांचे अभिनंदन केले. बीए/बीएसडब्ल्यु/सीसीजे द्वितीय सत्रासाठी ‘काव्य कलश’ व ‘पद्य परिमल’ ही दोन पुस्तके, बीकॉम/बीबीए द्वितीय सत्रासाठी ‘काव्य वैभव’ तर बीएससी/बीसीए व्दितीय सत्रासाठी ‘काव्य कुसुम’ ही पुस्तके अभ्यासक्रमासाठी आहेत.