एका दिवसांत 46 बाधित रुग्ण तालुका हादरला
प्रतिनिधी / नवारस्ता
पाटण तालुक्यातील येराड (खंडूचावाडा) येथे आज गुरुवारी 46 बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे तर गेल्या तीन दिवसात या ठिकाणी 50 पॉझीटीव्ह रूण सापडल्याने येराड गाव आता कोरोनाच्या हॉटस्पॉट च्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.एकाच वेळी एकाच गावात तब्बल 46 बाधित रुग्णामुळे पाटण तालुका हादरून गेला आहे.
पंधरा दिवसापूर्वी मुबंईहुन आलेल्या एकाची दि. 20 एप्रिल रोजी तपासणी केली असता तो बाधीत आढळुन आले. 21 एप्रिलला तीन बाधीत सापडले. त्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांना चाचणी करण्यास सागितले होते तर आज दि. 22 रोजी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने 138 जणांच्या चाचण्या घेतल्या यापैकी 62 रूग्ण बाधीत निघाले. यामध्ये एकटय़ा खंडूचावाडामधील 46 आणि तामकडे येथील 16 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान एकाच वेळी छोटय़ाशा गावांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बाधित रुग्ण आढळल्याने परिसरात येराड परिसर कोरोना हॉटस्पॉट होतेय का काय या भीतीने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
तहसीलदार तातडीने घटनास्थळी
यासंदर्भात पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे यांनी तातडीने येराड गावास भेट देऊन देऊन नागरिकांना खबरदारी घ्यायला सांगितली आहे. तसेच प्रशासनास तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.