यंदाचा आषाढी एकादशी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. त्याची विविध कारणे आहेत. सुमारे पंधरा लाख वारकरी या सोहळय़ाला येतील, असा सरकारी अंदाज पंढरपूरच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे. इतक्मया मोठय़ा संख्येने येणाऱया भाविकांची सोय करणे हा दरवषीचा शिरस्ता असला तरी गेल्या दोन वर्षांपासून त्यात खंड पडला आहे. कोरोनाचे सावट असल्याने आषाढी वारी नेहमीच्या जोमात झालेली नाही. यावषी राज्यभरातून भाविक येतील, शिवाय कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांची संख्या मोठी असेल, असा अंदाज आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे आणि भारतातही रोज हजारोंच्या संख्येने त्यात भर पडत आहे. अशा स्थितीत आषाढापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या किती असेल, याविषयी आरोग्य खात्यातर्फे कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, पालख्यांबरोबर येणाऱया वारकऱयांचे शंभर टक्के लसीकरण करावे आणि पंढरीत येणाऱया प्रत्येकाला मास्क सक्तीचा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मूळात संतश्रे÷ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या पालख्यांसोबत हजारो वारकरी प्रस्थान करत असतात. पालख्या पंढरीत पोचल्या की खऱया आषाढी सोहळय़ाला सुरूवात होते. या दोन मुख्य पालख्यांबरोबरच राज्यभरातून इतर अनेक पालख्या, दिंडय़ा येत असतात. शेगावच्या गजानन महाराजांची पालखी महत्त्वपूर्ण असते. संत मुक्ताबाई, सोपानदेवांच्या पालख्या असतात. या पालख्या राज्याच्या विविध भागांमधून मजल दरमजल करीत, मुक्काम करीत पंढरीत पोचत असतात. त्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कोरोनाच्यादृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. लाखो वारकऱयांची ही मांदियाळी पंढरीरायाचे दर्शन घेऊन सुखरूप परत आपापल्या गावी पोचल्यावर या सुखसोहळय़ाची सांगता होते. त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सरकारला कंबर कसावी लागणार आहे. पालख्या-दिंडय़ाच्या मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी तेथील ग्रामपंचायतींनी दक्षता घेणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर पंढरपुरात पोचल्यावर स्वच्छता आणि पाण्याचे मोठे आव्हान असेल. लाखेंच्या संख्येने येणाऱया भाविकांच्या निवासाची व्यवस्था पंढरीतील स्थानिकांच्या निवासस्थानांबरोबरच मठ-मंदिरांमधून होत असते. कित्येकजण चंद्रभागेत स्नान करतात आणि दर्शनरांगेतच अनिद्र स्थितीत दोन दोन दिवस उभे राहतात. पंढरपुरात 24 हजार शौचालये कायमस्वरूपी बांधून ठेवण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. वास्तविक, कोणतीही वारी नसताना पंढरपूरात किमान पाऊण लाख भाविक दर्शनाला आलेले असतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी वारी व्यतिरिक्त विठुरायाच्या दर्शनासाठी महिन्याच्या एकादशीला किमान एक लाख लोक पंढरपुरात आढळतात. पंढरपूरचे रहिवासी आणि बाहेर गावाहून येणारे वारकरी यांच्यासाठी अनेक सोयी कराव्या लागणार आहेत. तिरूपती बालाजी किंवा अन्य मोठय़ा देवस्थानाच्या ठिकाणी कितीही गर्दी झाली तरी भाविकांना फारसा त्रास होत नाही. कारण देवस्थानाचा कारभार शिस्तीचा आणि भव्य असतो. पंढरपुरातही मंदिर परिसरात राहणाऱया नागरिकांना तिथून अन्यत्र हलवून भाविकांसाठीच्या सोयी वाढवता येतात का, याचा कानोसा घ्यावा लागणार आहे. मंदिर भागातील गल्लीबोळांमुळे होणारी गर्दी, चेंगराचेंगरी आणि तत्सदृश्य प्रकार रोखायचे असतील तर अशा मोठय़ा निर्णयाची नितांत गरज आहे. अरुंद रस्ते, स्थानिक नागरिकांची वाहने आणि रहदारी यामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण होते. तिच्यावर मात करणे हे मोठय़ा कौशल्याचे काम ठरते. वारकऱयांच्या सोयीच्या अन्य गोष्टींकडे त्यामुळे बऱयाचदा दुर्लक्ष होते. श्री विठ्ठल मंदिर परिसरातील घरे अन्यत्र हलवून वारकऱयांसाठी सोयी करणे आज ना उद्या क्रमप्राप्त आहे. कारण पंढरपूरातील स्थानिक आर्थिक चलनवलन श्री विठ्ठलावरच अवलंबून आहे. त्यामुळे मंदिर परिसर दर्शनाच्यादृष्टीने जेवढा सुलभ होईल, तितकी भाविकांची संख्या वाढेल आणि वाढत्या भाविकांमुळेच स्थानिकांचा रोजगार वाढणार आहे. भविष्यातील पन्नास वर्षांचे नियोजन करायचे असल्यास इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय अग्रक्रमाने सोडवणे आवश्यक आहे. पंढरपूर परिसरात विमानतळ असणेदेखील अत्यावश्यक आहे. शिर्डीला देशभरातून येणाऱया भाविकांच्या संख्येत झालेली वाढ वाहतुकीच्या उत्तम सोयीमुळे झालेली आहे हे नाकारता येणार नाही. शिर्डीत केवळ स्थानिकच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून आलेले व्यापारी, उद्योजक, किरकोळ दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक कायमचे स्थायिक झाले आहेत. विमानसेवेबरोबरच पंढरपूरची भौगोलिक स्थिती पाहता रेल्वेसेवा अधिक दर्जेदार करता येणे शक्मय आहे. पूर्वी देवाची गाडी ही नॅरोगेज रेल्वे भाविकांच्या सोयीची होती. आता पंढरपूर हे रेल्वेमार्गावर केंद्रस्थानी आलेले आहे. दक्षिण भारताबरोबरच उत्तर भारतातूनही रेल्वेने इथे भाविकांना पोचता येऊ शकते. तसा विचार व्हायला हवा. पंढरपूरला पोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ता मार्गाने सुविधा देता येतात. संबंधित सर्व विभागाच्या, केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱयांनी एकत्रित विचार करायला हवा. पंढरपुरात स्थानिकांना रोजगाराबरोबरच अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून यात्रा काळात चंद्रभागेत पाणी सोडले जाते. ही परंपरागत पद्धत चालू ठेवून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे गरजेचे आहे. वारकऱयांसाठी चंद्रभागेतील स्नान हे महत्त्वाचे आन्हीक असते. मात्र, ज्या पद्धतीने चंद्रभागेच्या पात्रात स्त्री-पुरूष वारकऱयांची गर्दी होते, ती पाहता घाट बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. दर्शनाची रांग आणि चंद्रभागेतील स्नानासाठीची सुविधा यांच्यात समन्वय ठेवता आला तर गर्दी आटोक्मयात आणता येते.
Previous Articleभाजपला रोखण्यासाठी प्रसंगी रक्त सांडू : ममता बॅनर्जी
Next Article कचऱयाला कलाकृतीत बदलणारी महिला
Related Posts
Add A Comment