70 प्रवासी बेपत्ता, 50 जणांना वाचविण्यात यश
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत दोन प्रवासी नौका एकमेकींवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या नौकांमध्ये एकंदर 120 प्रवासी होते. त्यातील 50 जणांनी पोहून किंवा आपत्तीं निवारण दलाच्या साहाय्याने नदीतट गाठला आणि आपला जीव वाचविला. मात्र, 70 प्रवासी बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
परस्परविरोधी दिशांकडून या नौका येत होत्या. त्यांची समोरासमोर टक्कर झाली. एक नौका जोरहाटहून निमतीघाट येथून माजुली येथे निघाली होती. तर दुसरी नौका माजुलीहून जोरहाट येथे निघाली होती. दोन्ही नौका माजुलीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना त्यांची टक्कर झाली. यग्ना नौकांमध्ये 100 प्रवाशांखेरीज 25 ते 30 बाईक्सही होत्या. त्या प्रवाशांच्याच होत्या. त्यांनाही जलसमाधी मिळाली आहे. 70 जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत केला जात होता.
त्वरित आपत्ती निवारण सुरु
अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीएफआर) त्वरित कार्य सुरु केले. पोहणाऱया अनेक लोकांना या दलाच्या सदस्यांनी तटावर सुखरुप येण्यासाठी महत्वाचे साहाय्य केले. त्यामुळे आतापर्यंत 30 जणांचा जीव वाचला आहे. आणखी अनेक जणांना वाचविण्यग्नात यश येईल, अशी आशा या दलाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली. आपत्ती निवारणासाठी हेलिकॉप्टर्सचे साहाय्यही घेतले जात आहे. या अपघाताची दृष्ये चित्रित करुन ती पसरविण्यात आल्याने अपघाताची माहिती त्वरित समजण्यास साहाय्य झाले आहे.
या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली आहे, यग्नाची माहिती आपत्ती निवारणाचे काम संपल्यानंतरच देता येईल, असे या दलाच्या एका आधिकाऱयग्नाने स्पष्ट केले. आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्वा सर्मा यांनी आपले सचिव समीर कुमार सिन्हा यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच मंत्री बिमल बोरा यांना अपघातस्थळी जाऊन आपत्ती निवारण कार्यात साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
या अपघातामुळे आपल्याला अतीव दुःख झाले आहे. अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर प्रसारित केला आहे. आपत्ती निवारण दलाने त्वरित कार्य करण्यग्नास आरंभ केला असून जीव वाचविण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.