आसामच्या 126 विधानसभेसाठी तीन टप्प्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत एकूण 946 उमेदवार उभे राहिले असून यातील 264 जण कोटय़धीश आहेत. एकूण उमेदवारांच्या तुलनेत यांचे प्रमाण 27.90 टक्के आहे. सर्वात श्रीमंत उमदेवार युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरलचे कोक्राझार पश्चिम (अनुसूचित जमातीसाठी राखीव) मतदारसंघातील उमेदवा मनरंजन ब्रह्मा असून त्यांनी स्वतःची मालमत्ता 268 कोटी रुपयांची असल्याचे घोषित केले आहे.
ब्रह्मा यांच्यानुसार उधरबंदचे अपक्ष उमेदवार राहुल रॉय दुसऱया क्रमांकाचे धनाढय़ उमेदवार आहेत. त्यांनी 136 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे. तिसऱया स्थानावर एआययुडीएफचे जमुनामुखचे उमेदवार सिराजुद्दीन अजमल असून प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 111 कोटी रुपयांची आहे.
काँग्रेसचे सर्वाधिक 64 कोटय़धीश उमेदवार रिंगणात आहेतर भाजपच्या 60 उमेदवारांनी स्वतःची मालमत्ता 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची असल्याचे नमूद केले आहे. आसाम जातीय परिषदेचे 31, आसाम गण परिषदेचे 22, एआययुडीएफचे 11, बीपीएफचे 8 आणि युपीपीएलचा एक उमेदवार कोटय़धीश आहे.
व्होटर इंटरनॅशनल पार्टीचे उमेदवार सबेंद्र बासमुतारी यांची मालमत्ता सर्वात कमी ठरली आहे. त्यांनी स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात केवळ 2500 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद पेले आहे. याच पक्षाच्या कनक बासुमतारी यांनी स्वतःची मालमत्ता 5000 रुपयांच्या मूल्याची असल्याचे म्हटले आहे.