प्रतिनिधी/ महाड
रायगड जिह्यातील खोपोली येथील इंडीया स्टील कंपनीमध्ये स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या स्फोटाच्या आवाजाने सुमारे 4 किलोमिटरचा परिसर हादरुन गेला. स्फोट इतका जबररदस्त होता की कामगारांचे मृतदेह छिन्नविच्छन्न होऊन पडले हेते.
खोपोली शहरातील नागरी वसाहतीपासून काही अंतरावर असलेल्या इंडिया स्टील कंपनीमध्ये पहाटे दिडच्या सुमाराला अचानक मोठा स्फोट झाला. प्रचंड क्षमतेच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. या स्फोटामध्ये दिनेश वामनराव चव्हाण (55, रा.खोपोली) आणि प्रमोद दुधनाथ शर्मा (30, मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला. तर सुभाष धोडीबा वांजळे (55, रा. खोपोली) हा गंभीर जखमी झाला.
मरण पावलेल्या कामगारांचा मृतदेह छिन्नविच्छीन्न झाले होते. या कारखान्यामध्ये यापूर्वीही छोटय़ा-मोठय़ा दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. कंपनी व्यवस्थानपनाने सुरक्षाविषयक योग्य उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. दरम्यान स्फोटामागील कारण अद्याप समजू शकले नाही,