इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील धारवट झोपडपट्टी परिसरात गांजाची विक्री करणार्या एका महिलेला अटक केली. भाग्यश्री संतोष बागडे (वय 30, रा.धारवट झोपडपट्टी) असे त्या महिलेचे नाव आहे. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी तिच्या पतीवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तो सध्या पसार आहे. या कारवाईत 25 हजार 500 रुपये किंमतीचा 2 किलो 550 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, गांजाचे सेवन करणार्या चौघांना पोलिसानी अटक केली.
शहरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव व त्यांच्या पथकाने धारवट झोपडपट्टी येथील संतोष बागडे यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात 25 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. याप्रकरणी भाग्यश्री बागडे हिला अटक करण्यात आली. तर हा गांजा तिचा पती संतोष बागडे यांने विक्रीसाठी आणल्याचे व त्यांची पत्नी गांजा विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीसांनी बागडे दाम्पत्या विरोधी गुन्हा दाखल करीत, भाग्यश्री बागडे हीला अटक केली. तर तिचा पती पोलिसांची चाहुल लागताच फरार झाला आहे.
याच दरम्यान पंचगंगा नदीघाटाकडे जाणार्या जॅकवेल रस्त्यावर झाडाखाली गांजा ओढणार्या नौशाद करीम मुजावर, शिवाजी आकाराम भोसले, विशाल विजय बोंद्रे, अथर्व विजयकुमार कुलकर्णी (सर्व रा.इचलकरंजी) या चौघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सपोनि रुपाली पाटील, खंडेराव कोळी, शहनाज कनवाडे, प्रशांत कांबळे, रणजीत पाटील, बालाजी पाटील, अयुब गडकरी, सूरज चव्हाण, राजू कांबळे आदींनी केली.
Previous Articleदिल्लीत दिवसभरात 1,063 नवे कोरोना रुग्ण
Next Article 31 डिसेंबरच्या गैरप्रकारांना आळा घाला!
Related Posts
Add A Comment