इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील इंदिरानगरातील आवळे शेड नावाच्या इमारतीत सुरु असलेल्या अवैध तीन पानाच्या जुगार अड्यावर पोलिसांनी काल, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. पोलिसाची चाहुल लागताच अड्डा चालक बाबासो सिताराम पवार ( रा. शिरदवाड, ता. शिरोळ) आणि इमारत मालक अब्राहम आवळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) हे दोघे पसार झाले. तर २७ जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आले.
अटक केलेल्यांच्याकडून ४७ हजार ६१० रुपयाची रोकडसह, २२ मोबाईल हँन्डसेट, १७ मोटर सायकली आणि जुगाराचे साहित्य असा १० लाख ६३ हजार २१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे केली, अशी माहिती इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली.
गौस महंमद सय्यद, विनय शामसुंदर दसरे, साहेबलाल मोहद्दीन मुजावर, इकबाल पापालाल शेख, विशाल आप्पासाो खोत, मलिक शाहू पाथरवट, प्रविण रंगराव कटकुळे, राजू सुरेश कांबळे, सुरेश दत्तू पाटील, राजकुमार आण्णाप्पा पवार , वैभव सखाराम पाटील, मुदस्सर दस्तगीर कामत, सिकंदर आबालाल जमादार, अशोक ज्ञानदेव सुतार, विजय उध्दव डोईफोडे, प्रफुल प्रकाश पाटील, सागर राजाराम गायकवाड, दत्तात्रय दिनकर ढाकरे, अरविंद रामखस गिरंगे, मेहबुब शरीफ मुल्ला, करण शाम मछले, संतोष सुरेश पाटील, बंडू तुकाराम बिलुगडे, बाबासाो सिताराम पोवार, विजय श्रीराम कांबळे, चंद्रकांत किसन भोसले, जगदीश प्रसाद जोशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ परिसरातील आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अब्राहम आवळे याच्या मालकीच्या शहरातील इंदीरानगरातील आवळे शेड नावाच्या इमारतीत विश्वविजय युवक मंडळाच्या नावाखाली अवैधपणे तीन पानाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून या जुगार अड्यावर कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संयुक्तपणे छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गावभाग पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस उप निरीक्षक अंकुश कारंडे, अश्विनी वायचळ, पोलीस अमंलदार अर्जुन बंद्रे, किरण शिंदे, ओंकार परब, रवींद्र कांबळे, संभाजी भोसले, राजीव शिंदे, रणजित पाटील, फिरोज बेग, आयुब गडकरी आदीच्या पथकाने कारवाई केली.
Previous Articleकडेगाव, पलुस तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावू – नितिन गडकरी
Next Article कणकवलीत भला मोठा अजगर पकडला
Related Posts
Add A Comment