प्रतिनिधी /इचलकरंजी
येथील नगरपालिकेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या इमारतीतच पेट्रोलजन्य पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे केलेल्या या कृत्यामुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली. दरम्यान काही नागरिकांनी तात्काळ त्याच्या हातातील काडीपेटी काढून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या या निवृत्त कर्मचाऱ्याचे फंड वारंवार पाठपुरावा करूनही मिळाले नाही. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजता हा कर्मचारी पालिकेच्या इमारतीत आला. विरोधी पक्ष कार्यालय जवळ आल्यानंतर त्याने पेट्रोलजन्य पदार्थ अंगावर ओतून घेतले व हातात काडेपेटी घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याच्या हातातील काडीपेटी काढून घेतली व त्यास नळाखाली नेऊन त्याच्या अंगावर पाणी ओतले. त्यानंतर त्यास एका दालनांमध्ये बसवले.
पालिकेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान यापूर्वीही पालिकेच्या आवारात दोन वेळा विविध कारणांमुळे अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ करून घेण्याचे प्रकार घडले आहेत. यात सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांचा मृत्यू झाला आहे.
Related Posts
Add A Comment