चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / शिरोळ
महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शोध पथकाने अटक करून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 31 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी मयुर कुमार कदम, राज मगदूम हाऊसिंग सोसायटी आगर भाग ता. शिरोळ हे शिरोळ जयसिंगपूर बायपास रोडवरील अष्टविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्या बॅगेत ठेवण्यात आलेला महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
भरदिवसा चोरट्यांनी चोरी केल्याने खळबळ उडाली होती शिरोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पो हे कॉ ज्ञानेश्वर सानप, पो हे कॉ हनुमंत माळी, पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला, पो. कॉ. गजानन कोष्टी यांनी इचलकरंजी येथील संशयित आरोपी साहिल शब्बीर हवालदार वय 21, राजेश सदानंद वारे वय28 व दस्तगीर मौलाना पेंढारी वय 24 या तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल मोटरसायकल असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास पो. हे. कॉ. पाटील हे करीत आहेत.