मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचे कार्यालय राजभवनातून चालत असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपच्या मागण्या पुर्ण करण्याचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे कार्यालय हे राजभवन इथून चालत आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास सांगितले आहे. परंतु हे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदाबाबत नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाब काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील ठरवतील. यानंतर हे नाव काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात येईल मग हायकमांड त्याबाबत निर्णय घेईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
वाझे प्रकरणावरुन नाना पटोले यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे. वाझे प्रकरणात फडणवीसांनी जसे सांगितले तशा घटना घडत गेल्या यामागे भाजपचे षडयंत्र आहे का असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
Previous Articleपोषण आहार द्या : पैसे नको!
Next Article ‘पडळकर हे मनोरुग्ण, तेच भाजपची माती करणार’
Related Posts
Add A Comment