बातमीदार / नंदगड
इदलहोंड ग्रामपंचायतीवर दुसऱयांदा भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मंगळवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्यावेळी दोन्ही पदे भाजपाने आपल्या ताब्यात ठेवली आहेत. अध्यक्षपदी चांगाप्पा कृष्णा बाचोळकर (इदलहोंड) यांची तर उपाध्यक्षपदी रेखा महादेव गुरव (माळअंकले) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपद सामान्यासाठी तर उपाध्यक्षपद सामान्य महिलेसाठी होते. मंगळवारी या दोन्ही पदासाठी निवडणूक घेतली. दोन्ही जागासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने सदर निवड बिनविरोध केली. सदस्य उदय पाटील, यल्लाप्पा होसूरकर, लक्ष्मी गोपाळ सुतार, सुमन गणपती कोलकार, वैशाली उमेश धबाले, परशराम कुंभार, माया प्रकाश कुंभारसह सदानंद होसूरकर, रामू गुरव, गोविंद जाधव, दीपक जाधव, नागेंद्र होसूरकर, शिवाजी होसूरकर, नवनाथ होसूरकर, नारायण पाखरे, निशांत पाटील, विकास जाधव, सदोबा गोरल, मारुती सावंत, बाळाराम निडगलकर, किरण सुर्वे, यशवंत पाटील, मारूती निडगलकर व अनेक समर्थक उपस्थित होते. निवडीसाठी माजी ग्रा. पं. सदस्य गोविंद जाधव व माळअंकले गावातील पंचमंडळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.