ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सुप्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे आज सकाळी मुंबईमधील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. इरफानला क्लोऑन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्याचे निधन झालं. इरफानच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रातील दिग्दजांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इरफानच्या निधनाबद्दल आपल्या भावना ट्विट द्वारे व्यक्त केल्या आहेत.
मोदी आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो, असं मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, इरफान खान च्या निधनाने मी खूप दुःखी झालो आहे. तो एक अष्टपैलू अभिनेता होता. त्यांच्या अभिनयाने, कलेने जागतिक ख्याती आणि ओळख कामवाली होती. माझ्या सद्भावना त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांसोबत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. असं अमित शहा यांनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.